अजित पवारांना स्वतःची काहीही ताकद नाही, शरद पवारांमुळे त्यांची किंमत – निलेश राणे

अजित पवारांना स्वतःची काहीही ताकद नाही, शरद पवारांमुळे त्यांची किंमत – निलेश राणे

पुन्हा एकदा राणे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे. अजितदादांना स्वतःची काहीही ताकद नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे त्यांना किंमत आहे, असं मत निलेश राणे यांनी व्यक्त केलं.

पुढे बोलताना राणे म्हणाले की, अजित पवार यांनी बाता मारु नये, ते स्वतःच्या ताकदीवर साधा एक ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही. यावेळी त्यांनी आघाडी सरकार आल्यानंतर अजित पवार एक वर्षभर शांत का बसले होते, असा सवालही निलेश राणे यांनी उपस्थित केला होता.

“अजित पवार यांनी घोटाळे, सिंचन, बँका, घाणेरडी वक्तव्यं असं जे चित्र महाराष्ट्राला दाखवलं आहे ते महाराष्ट्र विसरलेला नाही. ते 5 वर्ष गप्प राहून मंत्रिपद उपभोगलं असतं तर काही वाटलं नसतं. अजित पवार स्वतःच्या ताकदीवर एक साधा ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही असे सुद्धा राणे यांनी बोलून दाखविले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: