“अजितदादांचे भाषण देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी’पणाच्या भाषेवर बुलडोझर फिरविणारे ठरले”

 

मुंबई | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यावेळेला सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी जोरदार फटकेबाजी केली. टाळ्या, हशा, टोलेबाजी यांमुळे सभागृह दणाणून निघाले. यानंतर आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या भाषणावरून आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली आहे.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात ज्या पद्धतीने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले, त्या सत्ता संघर्षाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बंडखोर आमदारांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या आरोपांना थेट आकडेवारी देऊन उत्तर दिले. अजित पवार यांनी केलेल्या भाषणानंतर अमोल मिटकरी यांनी ट्विट करून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

विधानसभेतील अजितदादांच्या आजच्या भाषणाने औट घटकेचे मुख्यमंत्री, गत सरकारमधील विरोधी पक्ष नेते व सद्य स्थितीत सहा महिन्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “मी” पणाच्या भाषेवर बुलडोझर फिरविणारे ठरले, असे टीकास्त्र अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमधून सोडले. या टिकेल आता भाजपा नेते काय रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

 

 

Team Global News Marathi: