अजित दादा लवकर बरे व्हा ! सुप्रिया सुळे यांचे भावनिक ट्विट

अजित दादा लवकर बरे व्हा ! सुप्रिया सुळे यांचे भावनिक ट्विट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ब्रीचकॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अंगात थकवा आणि कणकण असल्यामुळे अजित पवार दोन दिवसांपूर्वी होम क्वारंटाइन झाले होते.

मात्र आज सकाळी त्यांना उपचारांसाठी ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली होती. ‘माझी प्रकृती उत्तम आहे. काळजी करण्याचं कारण नाही,’ असं ट्वीट अजित पवार यांनी केले होते.

अजितदादा लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांचे चाहते व कार्यकर्ते करत आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही दादांसाठी खास ट्वीट केले आहे. ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. दादा लढवय्ये आहेत. महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्या बळावर कोरोना आजाराला पराभूत करुन लवकरच सर्वांच्या सोबत येतील. दादा,लवकर बरे व्हा’ असे ट्विट सुळे यांनी केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: