एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे जाणार; निविदा प्रक्रिया जिंकली

 

एअर इंडियाची मालकी तब्बल ६७ वर्षांनी पुन्हा एकदा मूळ मालकाकडे अर्थात टाटा सन्सकडे जाणार आहे. ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार, टाटा सन्सकडून एअर इंडियासाठी लावण्यात आलेली बोली मंत्री गटानं मान्य केली आहे. दरम्यान अद्याप टाटा सन्स किंवा एअर इंडियाकडून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडिया टाटा खरेदी करणार आहेत. ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियासाठी पॅनलने टाटा ग्रुपची निवड केली आहे. एअर इंडियासाठी टाटा ग्रुप आणि स्पाइसजेटच्या अजय सिंह यांनी बोली लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार लवकरच अधिकृतपणे याची घोषणा करु शकते.

दरम्यान, जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विमान सेवा रोखण्यात आल्या होत्या. त्यानंतर विमान सेवा बहाल झाल्यानंतर २९ जुलै १९४६ टाटा एअरलाइन्सचं नाव बदलून त्याचं नाव एअर इंडिया लिमिटेड करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यानंतर १९४७ मध्ये एअर इंडियातील ४९ टक्के भागीदारी भारत सरकारनं घेतली होती. १९५३ मध्ये याचं पूर्ण राष्ट्रीयीकरण करण्यात आलं होतं.

Team Global News Marathi: