“AIMIM च्या दोन मतांसाठी शिवसेनेवर.” राम सातपुतेंची शिवसेनेला खोचक टीका

 

महाराष्ट्रातील सहा राज्यसभेच्या जागांवर होत असलेल्या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM चे दोन आमदार महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ मतदान करतील. पक्षाच्या महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी मतदानापूर्वी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून ही माहिती दिली.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मनसेने देखील शिवसेनेवर निशाणा साधला. “AIMIM च्या दोन मतांसाठी शिवसेनेवर पदर पसरायची वेळ आली. अजून काय काय करायला लावेल यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची कुणास ठाऊक”, असा टोला भाजप आमदार राम सातपुते यांनी लगावला आहे.

मनसे नेते गजानन काळे यांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला. “राज्याची शोभा होईल, अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे. त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे”, असे ट्वीट गजानन काळे यांनी केली आहे.

Team Global News Marathi: