अहो दादा, असं मोघलांसारखं काय बोलता’ मिटकरी यांची चंद्रकांत पाटलांवर घणाघाती टीका

अहो दादा, असं मोघलांसारखं काय बोलता’ मिटकरी यांची चंद्रकांत पाटलांवर घणाघाती टीका

औरंगाबादचं नामकरण हा श्रद्धेचा विषय आहे, संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य असून हा राजकारणाचा विषय नाही. तसेच औरंगाबाद महापालिकेत सत्ता आल्यास पहिल्या दिवशी संभाजीनगर, असे नामकरण करु असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होते. आता पाटलांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार आमोल मिटकरी यांनी जोरदार टोला लगावला आहे.

अमोल मिटकरी यांनी थेट बिहारचा संदर्भ देत भाजपाची कोंडी केली आहे. भाजपाची सत्ता असलेल्या बिहारमध्ये देखील औरंगाबाद नावाचे शहर आहे. त्यावर भाजप काही बोलणार का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच अहो दादा, असं मोघलांसारखं का बोलता, असं म्हणत चंद्रकांत पाटलांवर जहरी टीका केली

,मिटकरी म्हणाले, “अहो दादा बिहारमध्ये पण औरंगाबाद नावाचं शहर आहे असं म्हणतात. त्याबद्दल भाजप सरकार काही बोलणार आहे की नाही? असं मोघलांसारखं काय बोलता. आम्ही “छत्रपती संभाजी महाराजांचं” नाव विमानतळाला देणाऱ्या प्रस्तावास केंद्र सरकारने अजून मंजुरी का दिली नाही?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: