प्रचंड गदारोळातही कृषी विधेयक झालं मंजूर, राज्यसभेत जबरदस्त हंगामा

प्रचंड गदारोळातही कृषी विधेयक झालं मंजूर, राज्यसभेत जबरदस्त हंगामा

कृषी विधेयकावरुन आज राज्यसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. परंतु सरकारने हे आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करुन घेतलं आहे.

तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी उपसभापतींसमोर नियम पुस्तिका फाडली 

बहुमत नाही, तरीही सरकारने आवाजी मतदानाने  विधेयक मंजूर करुन घेतले आहे 

राज्यसभेत प्रचंड गदारोळादरम्यानच कृषी विधेयक झाले मंजूर 

नवी दिल्ली: लोकसभेत कृषी विधेयक 2020 मान्य झाल्यानंतर आज राज्यसभेत देखील हे विधेयक पारित झालं आहे. पण आज (रविवार) यावेळी चर्चेदरम्यान प्रचंड गोंधळ उडाला. त्यामुळे या गदारोळातच राज्यसभेत हे विधेयक (Bill) आवाजी मतदानाने मंजूर झाले आहे. दरम्यान, सभागृहातील गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज हे उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. विधेयकाला विरोध करताना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांना सभागृहाचे नियम पुस्तिका दाखवली आणि त्यानंतर उपसभापतींच्या समोर जाऊन ती फाडली देखील. एवढेच नव्हे तर अनेक खासदारांनी आपल्या समोर असणारे  माईकदेखील तोडून टाकले. तसंच उपसभापतींसमोर असणारे माईक देखील तोडण्यात आले. 

राज्यसभेत जबरदस्त हंगामा

कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक ही तीन विधेयकं लोकसभेत मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर ही विधेयकं राज्यसभेत मांडण्यात आली होती. ज्यावरुन मोठा गदारोळ पाहायला मिळाला. दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार टी.एन प्रथपन यांनी कृषी विधेयक हे देशभरातील शेतकर्‍यांच्या विरोधी असल्याचे सांगत लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली.  

तत्पूर्वी कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकरी उत्पादन व्यापार व वाणिज्य (संवर्धन व सरलीकरण) विधेयक २०२० आणि शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन व कृषी सेवा विधेयक, २०२० या विषयावर चर्चा करण्यासाठी सभागृहासमोर सादर केले. केले. तोमर म्हणाले की, ‘दोन्ही विधेयके ऐतिहासिक आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडतील. या विधेयकांच्या तरतुदीनुसार शेतकरी कोठेही आपली पिके विकू शकतील व त्यांना इच्छित भावाने आपला माल विकण्याचे स्वातंत्र्य असेल. तसेच शेतकऱ्यांना संरक्षण देण्याच्या तरतुदीही करण्यात आल्या आहेत.’

काय आहे कृषी विधेयक? का होतोय याला विरोध?

मोदी सरकारला मोठा धक्का, ‘या’ मंत्र्याने दिला राजीनामा

PM मोदींचे पाच मोठे निर्णय ज्यांनी देशाचा चेहरामोहरा बदलला

दरम्यान, यावेळी राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी या विधेयकावरुन केंद्र सरकारवर प्रचंड टीका केली. ‘ही विधेयके मंजूर झाल्यानंतर देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार का?, तसंच यापुढे देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, अशी ग्वाही सरकार देऊ शकेल का?’ असे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: