“कृषी कायद्यांविरोधातील लढाईत शहीद झालेल्यांचे बलिदान शेतकरी विसरणार नाहीत!”

 

आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत मोठी घोषणा केली आहे. प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या निर्याणानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे.

तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी आंदोलनाचा जबरदस्त विजय आहे, असं अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी म्हटलं आहे. तसेच कायदे मागे घेण्याच्या मागणी बरोबरच शेतकऱ्यांना आधार भावाचे कायदेशीर संरक्षण मिळावे ही सुद्धा आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारने या बद्दल सुद्धा सकारात्मक घोषणा करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो, असं नवले यांनी सांगितलं.

आज शेतकरी आंदोलनाच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरात शेतकरी आंदोलनात ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व शाहिद शेतकऱ्यांची आज आठवण होते आहे. शेतकरी शहीदांचे हे बलिदान शेतकरी कधीच विसरणार नाहीत. शेतकऱ्यांना शेती संकटातून संपूर्णपणे बाहेर काढल्या आपला संघर्ष थांबविणार नाहीत, असंही नवले यांनी येवळी स्पष्ट केलं आहे.

Team Global News Marathi: