पुन्हा नितेश राणे यांनी शिवसेनेचा डिवचले, शिवसेना भावनांवर मोर्चा काढणाऱ्यांचा केला सत्कार !

मुंबई | शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात सामना अग्रलेखातून करण्यात आलेल्या टिकेला उत्तर देण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडून शिवसेना भवन येथे मोर्चा काढण्यात आला . याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथं जमले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. यावेळी गोंधळ उडाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

त्यातच आता शिवसेना भावनांवर जाऊन राडा करणाऱ्या भजरतीया जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आमदार नितेश राणे यांनी सत्कार केला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा राणे यांनी शिवसेनेचा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या ४० कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. नितेश राणेंनी शाल श्रीफळ आणि छत्रपती शिवरायांनी प्रतिमा देऊन भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा सत्कारही केला.

शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजींदर तीवाना, दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष अजित सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे, मुंबई कमिटी सदस्य रोहन देसाई यांच्यासाहित ४० कार्यकर्त्यांचा नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आता यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: