‘अफझल खानचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब’ मनसेचा टोला

 

र्वी महेश मांजरेकर निर्मित ‘हर हर महादेव’ हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारित चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाला आता काही जणांनी विरोध केला. ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही चुकीच्या पद्धतीने दाखवलेले आहे,

या चित्रपटाला विरोध करत सोमवारी रात्री दहाच्या सुमारास राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (यांनी ठाण्यातील विवियाना मॉल येथील शो बंद पडला. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले तसेच कोण जितेंद्र आव्हाड असा सवाल उपस्थित केल्यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रेक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. यानंतर आता मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष ठाण्यात सुरू झाला आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ‘हर हर महादेव’वर आपली भूमिका स्पष्ट करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. ‘अफझल खानचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब’ असे म्हणत मनसेने जितेंद्र आव्हाडांवर खोचक टीका केली आहे.

अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले आहे. ‘अफझल खानचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब यांचे इतिहासाचे ज्ञान… आणि हे महाराजांचा इतिहास खरा काय आणि खोटा काय ते सांगत आहेत, असे म्हणत खोपकर यांनी आव्हाडांवर टीकास्त्र सोडले आहे.

 

Team Global News Marathi: