शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याचा ओ शेठ गाण्यावर तुफान डान्स !

 

सातारा |  सातारा जिल्हा बँकेच्या निडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे यांचा एक मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर राष्ट्रवादी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी तुफान डान्स केला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत ‘ओ शेठ तुम्ही नादच केला थेट’ या गाण्यावर शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा बँकेची निवडणूक लागल्या पासून निकाल लागेपर्यंत राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे यांच्या विरोधात सर्व फासे आवळले होते. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले ज्ञानदेव रांजणे यांना जोरदार पाठिंबा देत राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी शिंदे याच्या विरोधात दंड थोपटले.

तसेच जावळी तालुक्यातील २५ सोसायटी मतदार संघाचे निवडणूक मतदान प्रतिनिधी यांना सहलीवर एक महिना फिरवले. कधी राजस्थान तर कधी केरळ, अशा एक महिनाभर पंचवीस मतदारांना सहलीवर घेऊन जाणारे राष्ट्रवादीचे वसंतराव मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे यांना जिल्हा बँक निवडणुकीत चांगलाच झटका दिला.

आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव करणाऱ्या ज्ञानदेव रांजणी हे उमेदवार नसून या निवडणुकीत दस्तुरखुद्द पडद्यामागचे शिवेंद्रसिंहराजेचे उमेदवार असल्याची सध्या चर्चा सातारा जिल्ह्यामध्ये जोर धरू लागली आहे. त्यामुळे अवघ्या एका मताने विजय झालेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांचा विजय झाल्यानंतर राष्ट्रवादीचे वसंतराव मानकुमरे यांनी आनंद साजरा केला.

Team Global News Marathi: