गजा मारणे पाठोपाठ पुणे पोलिसांची मोठी कारवाई, गुंड शरद मोहोळच्याही मुसक्या आवळल्या

गजा मारणे पाठोपाठ पुणे पोलिसांची मोठी कारवाई, गुंड शरद मोहोळच्याही मुसक्या आवळल्या

कोण आहे शरद मोहोळ?

पुणे : काही दिवसांपासून गुंड गजा मारणे (gaja marne) हा पोलिसांना (police) गुंगारा मारून पळून जात होता. मात्र, अखेर कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. गजा मारणे पाठोपाठ गुंड शरद मोहोळला (sharad mohol) बेड्या ठोकल्या आहेत. २६ जानेवारी रोजी गुंड शरद मोहोळने हजेरी लावलेल्या कार्यक्रमात धांगडधिंगा केला होता. याप्रकरणी त्याच्यावर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सातारा पोलिसांनी (satara police) गजा मारणेला अटक केली होती. त्यानंतर आता शरद मोहोळला बेड्या ठोकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

शरद मोहोळला दोन महिन्यांसाठी वास्तव्य करण्यास आणि प्रवेश करण्यास मनाई

पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईनुसार, शरद मोहोळला पुढील दोन महिने पुणे शहरात राहण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत की, शरद मोहोळला दोन महिन्यांसाठी वास्तव्य करण्यास आणि प्रवेश करण्यास मनाई केली असणार आहे. या आदेशामुळे ताज्या प्रकरणात जामीन मिळाला तरी शरद मोहोळ पुण्यात थांबू शकणार नाही आणि जामीन मिळाला नाही तर शरद मोहोळला कोठडीत दिवस काढावे लागतील. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिबंधात्मक कारवाईची मुदत आवश्यकतेनुसार वाढवली जाऊ शकते.

कातील सिद्दिकीच्या खुनातून शरद मोहोळची मुक्तता

शरद मोहोळ हा एक गुंड व्यक्ती असून, काही दिवसांपूर्वीच शहरातला मोहोळ टोळीचा म्होरक्या असणाऱ्या शरद मोहोळ याची कथित सिद्दिकीच्या खुनातून मुक्तता झाली होती. शरद मोहोळ याची खुन प्रकरणातून मुक्तता झाल्यानंतर त्याने देखील गजा मारणे टोळीसारखाच गाजावाजा केला होता. मात्र त्यावेळी पुणे पोलिसांनी काहीही कारवाई केली नव्हती. परंतु, गजा मारणे याच्यावर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

तळोजा कारागृहातून सुटका झाल्यावर त्याच्या समर्थकांनी जंगी मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले होते. तसेच गुंड शरद मोहोळने देखील पुण्यातील एका कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांनाही पोलिसांनी त्यांच्या साथीदारांसह अटक केली आहे. पोलिसांनी दोघांनाही पोलिसांनी एकाच वेळी कोर्टात हजर केले. कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि त्याच्या चार साथीदारांना खडक पोलिसांनी अटक केली होती.

खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर पडल्यावर गुंड शरद मोहोळ याने गेल्या एका कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन केल्याप्रकरणी त्याच्यासह पाच जणांना खडक पोलिसांनी मंगळवारी (ता.16) रात्री अटक केली आहे. गुंड शरद हिरामण मोहोळ (वय ३८), विश्वास बाजीराव मनेरे (वय ३७), मनोज चंद्रकांत पवार (वय ४२), स्वप्नील अरुण नाईक (वय ३५) आणि योगेश भालचंद्र (वय ४०) यांना अटक करण्यात आली होती. तर अक्षय भालेराव, सीताराम खाडे, दिनेश भिलारे, मंगेश धुमाळ यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा तुरुंगातील अंडा सेलमध्ये नाडीने गळा आवळून सिद्दीकीचा खून केल्याचा मोहोळवर आरोप

शरद मोहोळ याच्यावर येरवडा तुरुंगातील अंडा सेलमध्ये नाडीने गळा आवळून सिद्दीकीचा खून केल्याचा मोहोळवर आरोप होता. कातील सिद्दीकी हा संशयित दहशतवादी आहे. दरम्यान, शरद मोहोळ हा पुणे शहरातील मोहोळ टोळीचा म्होरक्या आहे. शरद मोहोळ याची काही दिवसांपूर्वीच कातिल सिद्दिकीच्या हत्या प्रकरणातून मुक्तता झाली आहे.

या कलमानुसार शरद मोहोळ करण्यात आली कारवाई

शरद मोहोळ याच्यावरती कलम १४३, १८८, ३७ (३) अंतर्गत फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम, ५१ बी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, गुंड शरद मोहोळ याने २६ जानेवारी रोजी एका कार्यक्रमाला हजर राहिला त्या कार्यक्रमात त्याच्या साथीदारांनी धिंगाणा केला असल्याची माहिती आहे. त्यावरुन खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहोळ याच्यासह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: