तेरा साथ’ अन् तेरा दिवसांनी भेट, नवनीत राणा ढसाढसा रडल्या; रवी राणा झाले भावुक

‘तेरा साथ’ अन् तेरा दिवसांनी भेट, नवनीत राणा ढसाढसा रडल्या; रवी राणा झाले भावुक

गेल्या 13 दिवसांपासून राणा दाम्पत्यांना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते. अखेर आज सुटका झाल्यानंतर दोघांनाही रडू कोसळले. यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या सुद्धा उपस्थितीत होते. आपल्या नेत्यांचा भावनिक क्षण पाहून कार्यकर्तेही भावुक झाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण (hanuman chalisa ) करणाऱ्या निर्धार करून आलेले आमदार रवी राणा (ravi rana) आणि खासदार नवनीत राणा (navneet rana) यांची अखेर 13 दिवसांनंतर जेलमधून सुटका झाली. आज लीलावती रुग्णालयात (lilavati hospital mumbai) रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट झाली. यावेळी रवी राणांचा हात हातात घेऊन नवनीत राणा हमसून हमसून रडल्या.

आमदार रवी राणा आणि खासदार रवी राणा यांना मुंबई हायकोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. अखेर आज 13 दिवसानंतर रवी राणा दाम्पत्यांची जामिनावर सुटका झाली

नवनीत राणा यांची तब्येत बरी नसल्यामुळे भायखळा जेलमधून सुटका करण्यात आली होती. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

तब्बल 13 दिवसांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांची लीलावती रुग्णालयात भेट झाली. यावेळी अत्यंत भावनिक असा क्षण होता.रवी राणा यांना पाहून नवनीत राणा यांना रडू फुटले.

रवी राणांनी त्यांचा हातात हात घेऊन त्यांना धीर दिला. नवनीत राणा यांना ब्लड प्रेशर आणि पाठीचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल केले आहे.

 

गेल्या 13 दिवसांपासून राणा दाम्पत्यांना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते. अखेर आज सुटका झाल्यानंतर दोघांनाही रडू कोसळले. यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या सुद्धा उपस्थितीत होते. आपल्या नेत्यांचा भावनिक क्षण पाहून कार्यकर्तेही भावुक झाले होते.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: