पुण्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, मनपा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु |

 

मुंबई | आगामी पालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा तयारी सुरु केलेली असून दोनच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पुणे मनपा निवडणुकीत एकला चलो रे’चा नारा मनसेने दिला होता. यानंतर आता पुण्यापाठोपाठ राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे. राज ठाकरे हे १६ ते १८ जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे नाशिक महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. नाशिक हा मनसेचा जुना बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे.

नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता राहिली आहे. त्यावेळी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामं केल्याचा दावा मनसेकडून केला जातोय. मात्र, असं असलं तरी नाशिककरांनी मनसेला दुसऱ्यावेळी नाकारल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा रोवण्यासाठी राज ठाकरे सरसावले असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या ३ दिवसांच्या दौऱ्यात राज ठाकरे संघटनात्मक मोठे निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Team Global News Marathi: