गोव्यानंतर महाराष्ट्रातही भगवा फडकणारच, गडकरी यांचे सूचक विधान

 

नागपूर | देशात पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात आपल्याला जो विजय प्राप्त झाला आहे. हा विजय आता इथेच थांबणार नाही. ही विजयाची पताका महाराष्ट्रातही लागणार. एक दिवस महाराष्ट्रातही आपला भगवान फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

देशातील चार राज्यात भाजपने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आज नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस याचे नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. गडकरी म्हणाले आहेत की, ”5 राज्याच्या निवडणुकीच्या निकालाचं वैशिष्ट म्हणजे जात, पात धर्म, भाषा यात न पडता जनतेने आपल्या भविष्यासाठी भारतीय जनता पक्षाला मतदान केले.”

यावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती. फडवणीस म्हणाले आहेत की, ”पाच राज्यांच्या निवडणुकीत आपचे विरोधक देव पाण्यात घालून बसले होते. ते म्हणत होते आता भाजपची चलती आहे, मात्र 10 तारखेला एकदा मतमोजणी होऊद्या हळूहळू भाजपचा प्रभाव कमी होईल. मात्र निकाल लागला आणि त्याचं उत्तर प्रदेश गेलं, याचं गोवा गेलं आणि याचं स्वप्न, स्वप्नच राहिलं असा टोला सुद्धा त्यांनी लगावला होता .

Team Global News Marathi: