गांधी यांच्या ट्विटनंतर नाना पाटोले आणि चंद्रकांत पाटील यांच्यातही सुरु झाले ट्विटर वॉर

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्विट करून देशाच्या माजी पंतप्रधान इंद्र गांधी यांची जुनी एक आठवण सांगितली होती. या आठवणीवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भगवा दहशतवाद याची आठवण करून देत गांधी यांना टोला लगावला होता.
आता पाटील यांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी प्रतिउत्तर दिले आहे. वसंत पंचमी निमित्त आमजी आजी इंदिराजी शाळेत जाण्यापूर्वी आम्हा दोघांच्या खिशात पिवळा रुमाल टाकत असत. आजही त्यांची परंपरा जपत माझी आई सरसोंचे फुल मागवून घरात वसंत पंचमी साजरी करते. तुम्हा सर्वांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा असे ट्विट केले होते.

या ट्विटवर पाटील यांनी टोला लगावला होता. ‘‘अरे देशानं हे काय पाहिलं? ही तिच काँग्रेस आहे, जी भगव्या दहशतवादाच्या गोष्टी करत होती. जिने प्रभू श्रीरामाला काल्पनिक सांगत मंदिर निर्माणाविरोधात आपल्या वकिलांची फौज उतरवली होती? तसं पाहिलं तरी ही निवडणुकीपुरतं हिंदुत्व असणारी काँग्रेस आहे असे त्यांनी म्हंटले होते.

पाटील यांच्या या टीकेला उत्तर देताना पाटोले म्हणाले की, राम मंदिराचं कुलुप तोडणारे श्रीमती प्रियंका गांधी यांचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी होते. हिंदू धर्म रक्तात भिनला आहे. त्याला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. राम मंदिराच्या नावाने पैसा गोळा करणाऱ्यांनो, काही वर्षांपूर्वीही तुम्ही राम मंदिराच्या नावाने पैसा गोळा केला होता. त्याचं काय केलं सांगा? असा टोला पाटील यांनी लगावला होता.

Team Global News Marathi: