बैलगाडा शर्यत यशस्वी करुन दाखवल्यानंतर गोपीचंद पडळकर म्हणतात की,

 

सांगली | राज्यात बैलगाडा शर्यतीला बंदी असताना भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट आघाडी सरकारला आवाहन देऊन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून मोठ्या रकमेचे बक्षिस जाहीर केले होते. मात्र तत्पूर्वी बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या होत्या. मात्र सरकारचा विरोध झुगारून आज सकाळी बैलगाडा शर्यती पार पडल्या होत्या.

यावर प्रतिक्रिया देताना आमदार गोपीचंद पदकलर म्हणाले की, आज सकाळी पहाटे पाच वाजता पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करुन शासन आणि प्रशासनाला कात्रजचा घाट दाखवला. बैलगाडा शर्यत यशस्वी करुन दाखवल्यानंतर त्यांनी प्रसार मद्यहैमांना पहिली प्रतिक्रिया दिली.

तुमच्याच समर्थकांनी ही शर्यत पार पाडली का? असा प्रश्न विचारल्यावर पडळकरांनी दावा खोडून काढत, “बैलगाडा हा कोणताही समर्थक नाही. बैलगाड्याला जात, पात, धर्म, प्रांत काहीही नाही. गोवंश हा वाचवला पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, अशी आमची साधी भूमिका आहे. जर आपण गोवंश जतन केला नाही, तर येणाऱ्या पिढीला आपल्याला चित्रात बैल दाखवण्याची वेळ येईल”, असं पडळकर म्हणाले.

Team Global News Marathi: