‘आदित्य ठाकरेंना लाज वाटते का’? मनसेचा संतप्त सवाल

 

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. बेस्ट उपक्रम आणि महापालिका भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा असल्याचा आरोप त्यांनी यावेळा केला. देशपांडे म्हणाले, की बेस्टनं 5 कंपन्यांना कंत्राटाची कामं दिली, वर्षभर या कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. 90 टक्के बसेस 3 महिने डेपोतून बाहेरच पडल्या नाहीत, मग कंत्राट केला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले, की नोकरी देण्यापूर्वी 20 हजार डिपॉझिट घेतलं गेलं. मात्र, ज्यांना नोकरी दिली नाही त्यांचे डिपॉझिटही पालिकेतच जमा आहेत आणि ते परत केले गेले नाही. गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसेच नाहीत. याशिवाय बेस्टला पालिकेत विलीन करण्याचं आश्वासन माजी मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, त्याचं काही झालं नाही, असं म्हणत त्यांनी 5 सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.

६ तारखेला लोकेश चंद्रा यांना १ मिनिटही केबिनमध्ये बसू देणार नाही. मनसे स्टाईल आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. माहीम कॉलेजला लाकडाच्या वखारी आहेत. मडला उभारलेल्या अनधिकृत स्टुडिओप्रमाणे इथेही अतिक्रमण केलं आहे.वारंवार तक्रार करून आणि जागा अनधिकृत असून लायसन्स इश्यू करून दिलं गेलं. 758 कोटी इतकी त्या जागेची व्हॅल्यू आहे. अशा कामांना कोणाचे आशीर्वाद? काय लागेबंधे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

पुढे संदीप देशपांडे म्हणाले, की कॅगचं ऑडिट करण्याचं आश्वासन दिलं, पालिकेचा ऑडिट डिपार्टमेंट अगोदरच आहे. 2200 जागा असताना त्या भरलेल्याच नाहीत. येणाऱ्या काळात आणखी भ्रष्टाचार मनसे समोर आणणार आहे, रोडसंदर्भातही काही खुलासे मनसेच्या हाती आले आहेत, असंही ते म्हणाले.

Team Global News Marathi: