आदित्य ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले प्रतिउत्तर

 

वेदांता-फॉक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रातून गुजरात गेल्याच्या आरोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, ‘दोन वर्षांपूर्वी वेदांता कंपनीला ज्या सवलची द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या होत्या’, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन वेदांता-फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेल्याचा गंभीर आरोप शिंदे सरकारवर केला. आदित्य ठाकरेंच्या आरोपानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘दोन वर्षांपूर्वी वेदांता कंपनीला ज्या सवलची द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या होत्या.

परंतु नेमकं दोन वर्षांमध्ये त्याचा फॉलोअप घेतला गेला नाही. आता याबाबत केंद्र सरकार आणि अग्रवाल हे कंपनीच्या मालकांसोबत बातचीत करून तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं. तसेच ‘दसरा मेळावा होणार आहे. कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे असे म्हणत थेट शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दसरा मेळावा परंपरागत होत असल्याने हा मेळावा घेण्याचे ठरले आहे. लवकरच त्याबाबत कुठे होणार आहे ते कळवले जाईल’ असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. ‘आज संघटनात्मक दृष्ट्या पदाधिकारी आमदार खासदार यांची बैठक घेण्यात आली. राज्यातील सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचण्याचे सांगण्यात आले.त्यासाठी शिवसंवाद यात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे. आणि सरकारचे काम तळागाळातील आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा काम होणार आहे, असंही ते म्हणाले.

Team Global News Marathi: