आदित्य ठाकरेंच्या विधानावर नितेश राणेंचं पुन्हा म्याव म्याव!

 

मुंबई | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला. यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय. असं असताना शिवसेनेला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय. यातच आता पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना डिवचंल आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करुन आदित्य ठाकरे यांना डिवचलंय. यापूर्वी देखील नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या इमारतीबाहेर आदित्य ठाकरेंना डिवचलं होतं. यावेळी भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलाच वार-पलटवार बघायला मिळाला होता. विधिमंडळातही त्यावेली हा मुद्दा गाजला तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील यावर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा असाच प्रकार पहायला मिळालाय.

आमदार नितेश राणे यांनी ट्विट करताना म्हटलंय की, एअरपोर्ट ते विधानभवनाचा रस्ता वरळीतूनच जातो. माझ meow meow ऐकून थांबा बररर..का !!’ असं म्हणत पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना लक्ष केलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये या न त्या कारणावरुन वार पलटवार होत असतात. दोन्ही मोठ्या नेत्यांकडून टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. यातच आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष केलं आहे.

 

Team Global News Marathi: