आदित्य ठाकरे निवडणूक चिन्हावरच्या प्रश्नावर स्पष्टच बोलले; म्हणाले की,

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल-तलवार तर ठाकरे गटाला मशाल हे नवीन निवडणूक चिन्ह अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले आहे. आयोगाच्या या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी आमच्याकडे बहुमत असून ‘धनुष्यबाण’ चिन्ह आम्हाला मिळायला हवं होतं असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

याचसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी एका संकेतस्थळाला मुलाखत देताना म्हटले,”उद्या धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदेंकडे गेलं तरी तुमची लढण्याची तयारी आहे का? कारण निवडणूक आयोगाचा संपूर्ण निर्णय अद्याप लागलेला नाही. सध्या देण्यात आलेला निर्णय हा अंतरिम निर्णय आहे,” असा सवाल करण्यात आला

या प्रश्नावर उत्तर देताना, “काय होतं हे बघणं गरजेचं आहे. कारण हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे परिवार यांच्याबद्दल राहिलेला नाही. हा प्रश्न न्यायव्यवस्थेसंदर्भात आहे. न्याय होणार आणि आमच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे. संविधान आणि लोकशाहीबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मला वाटतं की फक्त देशाचं नाही संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे,” असे अदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

“३ नोव्हेंबरच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबरोबरच आगामी निवडणुकांमध्ये बाळासाहेबांचे विचार आणि संपूर्ण कॅडर कोणाकडे आहे हे कळेल,” असे पत्रकाराने म्हटले. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य यांनी, “तुम्ही जे सांगितलं ते ऐकून आज मला बच्चनसाहेबांचा वाढदिवस असल्यानिमित्त एकच शब्द आठवतोय तो म्हणजे ‘अग्निपथ’ हेच शब्द मी आज सगळीकडे घेऊन फिरत आहे,” असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

Team Global News Marathi: