आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ असलेल्या वरळीत अभिनेत्री दिशा पटानीच्या चित्रपटाचे शूटिंग, मनसेने पडले बंद

मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ असलेल्या वरळी कोळीवाडा येथे कोरोना नियमांचे उल्लघन करून अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी संतोष धुरी यांनी बंद पाडले आहे.

या चित्रपटाच्या शुटिंगच्यावेळी वरळी कोळीवाड्यात कोरोनाच्या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. या शुटिंगसाठी अभिनेता जॉन अब्राहम आणि दिशा पटानी वरळी कोळीवाड्यात आले होते. या सर्व कलाकारांनी तसेच त्यांच्यासोबत असलेल्या इतर स्टाफने मास्क न घातल्याचा आरोप, मनसेचे नेते संतोष धुरी यांनी केला होता.

मंत्री आदित्य ठाकरे यांचे बॉलीवूड मधील अनेक कलाकारांबरोबर चांगले संबंध आहे. तसेच जॉन अब्राहम आणि दिशा पटानी यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे या कलाकारांशी आदित्य ठाकरे यांची असलेली मैत्रीमुळे हा विषय अधिक चर्चेत आला होता. त्यामुळे आता वरळी कोळीवाड्यातील दिशा पटानीच्या चित्रपटाच्या शुटिंगचा विषय चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: