सिनेअभिनेत्री कंगना राणावत चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर

सिनेअभिनेत्री कंगना राणावत चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर

सिनेअभिनेत्री कंगना राणावत आणि वाद हे काही नवीन समीकरण नाही. काही दिवसांपूर्वी मुंबई आणि मुंबई पोलिसांवर टीका करून तसेच कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत नवा वाद अंगावर ओढावून घेतला होता. त्या पाठोपाठ सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजात समाजात तेढ निर्माण करणे, द्वेष पसरविणे यामुळे कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.

त्यात कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी आज तिला आणि तिची बहीण रंगोली चंदेल
पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर होत्या. आज त्या दोघींचा जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्या आहेत. सध्या कंगना व रंगोली यांचे पोलीस स्टेशनच्या आवारातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणे, द्वेष पसरविणे यामुळे कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी चौकशीसाठी तिला ३ ते ४ वेळा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, त्याकडे कंगनाने दुर्लक्ष केले होते. अखेर आज स्वत: कंगना पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: