मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचे दुष्परिणाम भारताला भोगावे लागणार – अनंत गाडगीळ

मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचे दुष्परिणाम भारताला भोगावे लागणार – अनंत गाडगीळ

अमेरीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सारख्या बेजबाबदार व्यक्तीसाठी लाखो रुपये खर्च करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी जणू एक मोठी रॅली आयोजित केली होती.

निवडणुकीत उमेदवार असलेल्या दुसऱ्या राष्ट्राच्या अध्यक्षासाठी एखाद्या दुसऱ्या देशात अशी रॅली आयोजित करणे परराष्ट्र धोरणाला अनुसरुन होत नसते. अशा ट्रम्प यांच्यासोबतच्या नरेंद्र मोदी यांच्या दोस्तीचे दुष्परिणाम भविष्यात भारत देशाला भोगावे लागणार आहेत,अशी टीका काँग्रेस प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

पुढे गाडगीळ म्हणतात की, इंग्लडमध्ये नवा कोरोनाचा प्रसार होऊ लागला आहे. त्यात इंग्लडच्याच पंतप्रधानांना प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. आता तर तो दौराही रद्द करण्यात आल्यामुळे भारतावर नामुष्कीची वेळ आली आहे.

याशिवाय भारता भोवतालच्या नेपाळ, श्रीलंका व भूतान या देशामधील राजकीय घटना व चीनचा या देशांवरील वाढत चाललेला प्रभाव या साऱ्यामुळे मोदींच्या परराष्ट्र धोरणातील अपरिपक्वता उघड झाली आहे असे बोलत त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: