अभिनेता सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाजच्या भावाने केला खळबळजनक खुलासा

 

मुंबई | अभिनेता आणि बिगबॉस विनर सिद्धार्थ शुक्लाचं निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थ अर्ध्यातच सोडून गेल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थ शुक्ल निघून गेल्याने कुटुंबातील सदस्यांची अवस्था वाईट झाली आहे. चाहते देखील दु:खी झाले आहेत. कोणीही काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही.

सिद्धार्थवर मनापासून प्रेम करणाऱ्या शेहनाज गिलची अवस्था पाहून सगळ्यांना आणखीणच भरुन आलं. दरम्यान, शहनाजचा भाऊ शाहबाजने सिद्धार्थच्या आठवणीत पहिलीच पोस्ट शेअर केली आहे.सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाल्यापासून शेहनाज गिल बेशुद्ध झाली आहे, तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत. तिचा भाऊ शेहबाज गिल तिला सांभाळण्यासाठी मुंबईत आला. सिद्धार्थच्या अंत्ययात्रेत तो शहनाज गिलसोबत राहिला आणि बहिणीला आधार दिला.

अंत्यसंस्कारानंतर शेहनाजचा भाऊ शाहबाज याने सोशल मीडियावर सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहिली आहे. शेहबाज गिलने सोशल मीडियावर लिहिले आहे – “माझा शेर, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि नेहमीच राहील. मी तुझ्यासारखा होण्याचा प्रयत्न करेन. हे माझे आता स्वप्न आहे आणि हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. मी शांततेत विश्रांती घे असं म्हणणार नाही कारण मला माहित आहे की तू तिथे नाहीस, तुझ्यावर प्रेम सिद्धार्थ शुक्ला. अशी पोस्ट लिहिली आहे.

Team Global News Marathi: