अभिनेता शारुख खान मुलाची भेट घेण्यासाठी दाखल झाला आर्थरोड जेलमध्ये

 

मुंबई | शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा अर्ज फेटाळल्यानंतर आज शाहरुख खान स्वत: आर्यनची भेट घेण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. दहा मिनिटे आर्यनशी शाहरुखने संवाद केला. कालही जामीन अर्ज फेटाळल्यामुळे क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये राहावे लागणार आहे.

काल मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. काल न्यायालयात कोणताही युक्तिवाद झाला नाही. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या वकिलांनी युक्तिवाद यापूर्वीच पूर्ण केले होते. सुनावणी पूर्ण झाल्यावर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. न्यायाधीशांनी न्यायालयात आल्यावर थेट निर्णय जाहीर केला होता.

काल मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या वकीलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. आर्यन खानच्या वकिलांना निकालाची तपशीलवार प्रत मिळताच त्यांनी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यापुढे जामीन अर्ज सादर केला आणि गुरूवारी म्हणजे आज तातडीची सुनावणी घेण्याचा विनंती अर्जही सोबत दाखल करण्यात आला होता.

Team Global News Marathi: