मृत्यूनंतरही अमर झाले अभिनेता पुनीत कुमार; निधनानंतर डोळे दान, वडिलांच्या पावलावर पाऊल

मृत्यूनंतरही अमर झाले अभिनेता पुनीत कुमार; निधनानंतर डोळे दान, वडिलांच्या पावलावर पाऊल

पुनीतचा अनाथाश्रम आणि गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोलाचा मोठा वाटा आहे.

बंगळुरु (कर्नाटक) : कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं काल वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं. काल (शुक्रवार) त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेता पुनीत हा अनाथाश्रमातील मुलांसाठीच काम करणारा म्हणून मर्यादित नव्हता, तर खऱ्या आयुष्यात देखील पुनीत राजकुमार एका ‘राजा’सारखाच होता. हजारो विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाबरोबरच वृद्ध आणि अनाथांच्या पालनपोषणाचं काम देखील त्यानं केलंय. पुनीतनं समाजासाठी योगदान दिल्याचं कधीही उघड न करता, तो प्रामाणिक सेवा करत होता.

पुनीत यांनी देखील त्यांच्या वडिलांप्रमाणे नेत्रदान केले आहे. पुनीत यांचे वडिलांनी राजकुमार यांनी १९९४ मध्ये आपले संपूर्ण कुटुंब नेत्रदान करेल असा निर्णय घेतला होता. राजकुमार यांचा १२ एप्रिल २००६ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. पुनीत यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे नेत्रदान करण्यात आले आहे.

अभिनेता चेतन कुमार अहिम्सा याने ट्विट करून पुनीत राजकुमार यांनी नेत्रदान केल्याची माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘जेव्हा मी अप्पू सरांना बघायला रुग्णालयात गेलो. तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर सहा तासांनी डॉक्टरांची एक टीम त्यांचे डोळे काढण्यासाठी आली होती. डॉ. राजकुार आणि निम्मा शिवन्ना यांनी त्यांचे डोळे दान केले तसेच अप्पू सरांनी देखील केले… ‘यावेळी अभिनेता चेतन यांनी देखील सर्वांना नेत्रदान करण्याचा आग्रह केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘ अप्पू सरांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांना आपण आदरांजली वाहू या….’

दरम्यान, अभिनेते पुनीत राजकुमार यांचे पार्थिव बंगळूर येथील कंठीरवा स्टेडियमवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. तेथे त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. स्टेडिअममध्ये आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुनीत यांचे अंत्यदर्शना घेण्यासाठी चाहत्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.अनेकांना त्यांचे अश्रू अनावर झाले आहेत. अभिनेता पुनीत यांनी बालकलाकार म्हणून त्यांनी कारकिर्दीस सुरुवात केली. कन्नड चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारे ते कलाकार होते. चाहत्यांमध्ये ते अप्पू या नावाने ओळखले जायचे.

अभिनेता पुनित यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यासह बॉलिवूडमधल्याही अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

पुनीतचा अनाथाश्रम आणि गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोलाचा मोठा वाटा आहे. पुनीतची ही वीरता केवळ पडद्यावरच्या अभिनयापुरती मर्यादित नव्हती. तर वास्तविक जीवनात ‘राजकुमार’ म्हणून तो अनेक अनाथ मुलांचं संगोपन करत होता. पुनीतनं आजवर कुठेही स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख दाखवली नाही. पुनीतनं 26 हून अधिक अनाथाश्रम, 25 शाळा, 19 गोशाळा, 1800 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, 16 वृद्धाश्रमचे पालनपोषण केलंय. याशिवाय जवळपास 45 शाळकरी मुलांचं जीवन घडवलंय. पुनीतच्या सामाजिक कार्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. राजकुमारनं सिनेमातून मिळणाऱ्या कमाईचा काही भाग वृद्धाश्रमाला दान केल्याचं सांगितलं जातंय.

पुनीत राजकुमारची माहिती

पुनीत राजकुमार हा कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

पुनीत असा झाला ‘सुपरस्टार’

पुनीत यांना अप्पू या नावाने ओळखलं जातं. २००२ मध्ये त्यांना ही ओळख मिळाली. ‘अभी’, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ आणि ‘अनजनी पुत्र’ यांसारख्या चित्रपटात ते झळकले आहेत.‘Yuvarathnaa’ या चित्रपटात ते अखेरचे झळकले असून याच वर्षी त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: