पुण्यातील प्रदूषणाबाबत पर्यावरण मंत्री ठाकरेंचा निर्धार घेतला हा निर्णय

 

पुणे | शहरात वाढते प्रदूषण ही अतिशय चिंताजनक बाब असून, विविध पर्यावरणीय समस्यांमुळे होणारे वातावरणातील बदल आणि त्यामुळे उद्‌भवणारी संकटे यावर उपाय करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गत २०३० सालापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून पुण्यातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा मानस असल्याचे राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुण्यात विविध पर्यावरण विषयक कार्यांचा आढावा घेत, घनकचरा व्यवस्थापन, शहरात सार्वजनिक वाहतूक इलेक्‍ट्रिक करण्यासंदर्भात, मुंबईप्रमाणे पुण्यासाठी वातावरण कृती आराखड्याचे नियोजन करणे, स्थानिक पातळीवर पर्यावरणस्नेही पायाभूत सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, विविध ठिकाणी ग्रीन क्‍लस्टर्स आणि अर्बन फॉरेस्ट उभारण्याबाबत चर्चा केली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘वातावरणीय बदल ही अलीकडील काळात गंभीर समस्या बनली असून, त्यादिशेने तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने आम्ही शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहोत आहि माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

Team Global News Marathi: