“अबब पाच रुपयांमध्ये शंभर किलोमीटर”

“अबब पाच रुपयांमध्ये शंभर किलोमीटर”

खर्डी:- (अमोल कुलकर्णी )

देशभरामध्ये पेट्रोल, डिझेल,गॅस अशा इंधनांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असताना सामान्य व्यक्तीला प्रवास करणे कठीण होत चालले आहे.तसेच रोज प्रवास आवश्यक असणाऱ्या नोकरदारांना देखील यातून सुटकेचा मार्ग दिसत नाहीय.या गरजेतूनच कराड तालुक्यातील तांबवे गावामधील अतुल आणि अमोल पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक सायकल तयार केली आहे.

या सायकलीला लाईट,हॉर्न आणि चोरीला जाणार नाही असा सायरन अलार्म बसवलेला आहे.या सायकलीसाठी कोणत्याही लायसेन्स, पासिंग,विमा, रजिस्ट्रेशन आदी बाबींची गरज नाही. तुमच्या घरातील सायकल असल्यास नाममात्र किमतीमध्ये त्याला मशीन बसवून दिले जात असल्याची माहिती अतुल पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

अशा प्रकारच्या काहीच सायकलचे हक्क नामांकित कंपन्यांनी काही राज्यापुरते मर्यादित ठेवले आहेत.किमती पण जास्त आहेत आणि मायलेज कमी आहे.पण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील सामान्य ग्राहकांना कमी किमतीमध्ये परवडणारी सायकल बनवण्याचा ध्यास लॉकडाऊन च्या काळामध्ये अतुल आणि अमोल या दोन भावंडांनी घेतला होता. शेतकरी कुटुंबात असणारे अमोल काही काळ पुणे येथे नोकरी करत होते.पण स्वतःचा काहीतरी आविष्कार घडवण्याच्या जिद्दीने त्यांनी या सायकलीचे प्रारूप आपल्यासमोर ठेवले आहे.

ज्यांचा प्रवास कमी आहे अशांसाठी कमी क्षमतेची बॅटरी वापरली आहे.तर सर्वाधिक 110 किलोमीटर ऍव्हरेज देणारी बॅटरी ही वेगळ्या पद्धतीची वापरली आहे याबाबत अधिक नव्याने बांधणी केली जात आहे. पर्यावरण पूरक असल्याने कोणतेही प्रदूषण नाही तसेच बॅटरी संपल्यास पायडलचा वापर करून सायकल चालवू शकतो.सध्या बाजारातील सायकलीचा वापर करून मशिनरी बसवली जात आहे.

 

लवकरच नामांकित कंपन्यांकडून सुट्टे भाग घेऊन स्वतःचे मॉडेल तयार करणार असल्याचे अतुल पाटील यांनी सांगितले. साधारण पाच तासांचा कालावधी चार्जिंग साठी लागत असल्याने पाच ते सहा रुपये खर्च येतो आणि त्यावर साधारण सत्तर ते एकशे दहा किलोमीटर सरासरी मायलेज मिळत आहे.घरातील टाकाऊ बॅटरी ही पुन्हा वापरात आणण्याचे ही उद्योग लवकरच उभारला जाणार आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातील खरेदी किंवा घरातील सायकल बनावटी बाबत अनिरुद्ध बडवे(9226337627)(अमोल कुलकर्णी (9922767696) यांचेशी संपर्क करावा असे आवाहन अतुल पाटील यांनी केलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: