आता नरेंद्र मोदींच्या रडारवर महाराष्ट्र, प्रत्येक घटनांकडे देतायत बारकाईने लक्ष

 

नवी दिल्ली | पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पाषाण आता महाराष्ट्रात सतत स्थपन करण्याचा मानस केला आहे तसेच भाजपचे बडे नेते याविषयी भाष्य सुद्धा करताना दिसून येत आहेत अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटनेकडे स्वत: बारकाईने लक्ष देत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांबरोबर ते सातत्याने बैठका घेत असून सीबीआय, आयबी, ईडी व अन्य तपास यंत्रणांकडूनही माहिती घेत आहेत. मोदी त्यांच्या कामात अत्यंत व्यग्र असले तरीही प्रत्येक कळीच्या विषयावर त्यांचे बोट अचूक असते आणि त्याबाबतची सर्व माहिती दस्तुरखुद्द घेत असतात. महाराष्ट्रातील सत्तारूढ महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध बेधडक कारवाई करा, असे संकेत मोदींनी दिले आहेत.

”लोकांनी मला भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी कौल दिला आहे आणि ते काम केले नाही तर त्यांच्या अपेक्षांना आपण पुरे पडलो नाही, असे होईल. जनमताचा कौल मी नजरेआड कसा करू?” – असा प्रश्न त्यांनी पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांसमोर केला तेव्हा तपास यंत्रणांच्या फायलींवर साठलेली धूळ आपोआप झटकली गेली असणार. शिवाय एवढे बोलून मोदी थांबले नाहीत. या भ्रष्ट नेत्यांच्या पाठीशी असलेली यंत्रणा सक्रिय झाली आणि स्वतंत्रपणे काम करणाऱ्या तपास यंत्रणांवर चिखलफेक करू लागली. तपास यंत्रणांना बदनाम करण्याच्या नवनव्या क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. जातीय परिमाणे जोडली जात आहेत. न्यायालयांचाही अपवाद केला जात नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

 

Team Global News Marathi: