आता लॅपटॉप प्रत्येकाच्या बजेटमध्ये; पाहा जिओ लॅपटॉपची वैशिष्ट्ये आणि किंमत

 

-सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणारा रिलायन्स जिओचा लॅपटॉप बाजारात येत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी रिलायन्स जिओचा 4G सिम कार्ड-लेस लॅपटॉप लवकरच बाजारात उपलब्ध करत आहेत.हा लॅपटॉप जिओ फोनप्रमाणे भारतीय बाजारपेठेतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल,असा रिलायन्स जिओचा दावा आहे. या लॅपटॉपची किंमत 15,000 रुपये असेल. सर्वसामान्यांचे बजेट लक्षात घेऊन या लॅपटॉपची किंमत निश्चित करण्यात आली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलेय.

जिओ लॅपटॉपसाठी यूएस-आधारित वायरलेस टेलिकम्युनिकेशन उत्पादने बनवण्यासाठी रिलायन्स ग्रुपने क्वालकॉम आणि मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केली असल्याची माहिती समोर आली आहे. याबरोबरच चांगल्या तंत्रज्ञानासाठी आर्म लिमिटेड आणि विंडोज ओएस कंपनी अॅप्सद्वारे संगणकीय चिप्स तयार केल्या जात आहेत.

रिलायन्स जिओ हे भारतातील सर्वात मोठे टेलिकॉम नेटवर्क आहे. हा लॅपटॉप लवकरच देशातील शाळा आणि सरकारी संस्थांसाठी उपलब्ध होणार आहे. येत्या तीन महिन्यांत तो बाजारात येईल असे रिलायन्स जिओकडून सांगण्यात येत आहे. बाजारात सध्या 20 हजार रूपयांपासून लॅपटॉपच्या किमती आहेत. मात्र, रिलायन्सचे हे लॅपटॉप 15 हजार रूपयांना मिळणार आहे.

Team Global News Marathi: