भाजपविरोधात ‘आप’ला कॉंग्रेसचा हात; केंद्र सरकारच्या त्या अध्यादेशाला दर्शवला विरोध

अनेक दिवसांपासून केंद्र सरकार आणि आप यांच्यात वाद सुरु आहे. केंद्र सरकारकडून अध्यादेश आणत आहे. त्याला मात्र आपकडून विरोध केला जात आहे. त्यासाठी आपकडून देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यावर आपला अनेक विरोधी पक्षांनी कॉंग्रेसला साथ देण्याचे मान्य केले आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी अध्यादेशाविरोधात आपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यसभेत अध्यादेश रोखण्यासाठी आम आदमी पक्ष विरोधी पक्षांना एकत्रित करण्यात व्यस्त आहे. रविवारी आप नेते राघव चड्ढा यांनी काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांच्या विधानावर ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर या अध्यादेशावर ‘आप’ला काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची आशा व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मला वाटते की तुम्ही उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार आहात, जोपर्यंत अध्यादेशाचा संबंध आहे. या अध्यादेशाला आम्ही पाठिंबा देणार नाही, अशी आमची भूमिका स्पष्ट आहे.

दुसरीकडे, काँग्रेस सरचिटणीसच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना आपचे राज्यसभा सदस्य म्हणाले की, काँग्रेसने दिल्ली अध्यादेशाला आपला स्पष्ट विरोध जाहीर केला आहे. आप नेते राघव चढ्ढा यांचे ट्वीट समोर आल्यानंतर,वर आम आदमी पार्टीला काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याच्या आशा निर्माण होत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

Team Global: