आम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, शेंबड्या पोराला समजवतात तसं पडळकरांना समजवा

 

राज्यात मागच्या काही दिवसांपासून भाजपा आमदार ओपीचंद पडळकर हे सतत महाविकास आघाडीवर आणि विवशेस करून पवार कुटुंबियांवर आरोप करताना दिसून आले आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त निर्माण झालेल्या वादानंतर राष्ट्रवादी आणि भाजपात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलेले दिसून आले होते. अशातच आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी पुन्हा गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपच्या मोठ्या नेत्यांनी यांना आवरलं पाहिजेय. आपण काय आहोत मोठ्या नेत्यांवर बोलताना याचा विचार केला पाहिजे यांच कर्तुत्व काय ? सांगली पोलीस स्टेशनमध्ये किती केसेस आहेत ते बघा, त्यांना अराजकीय कार्यक्रम घेता आला असता मात्र त्यांनी फक्त राजकारण केलं. घरातला शेंबडा पोरगा असेल तर मोठी माणसं सांगतात तसं यांना मोठ्या नेत्यांनी सांगितले पाहिजे, असा खोचक टोला आज पडळकरांना रोहित पवारांनी लगावला आहे. त्यामुळे आता पुन्हा यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

पवारांचा राजकारण हे नेहमीच पडळकरांच्या टार्गेटवर असतं. ना रोहित पवार पडळकरांवर टीका करण्याची संधी सोडतात. ना पडळकर रोहित पवारांवर टीका करण्याची संधी सोडतात. मात्र आता गेल्या काही दिवसांपूर्वीच चौडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पार पडली. या जयंतीनित्ताने रोहित पवार यांनी यंदा पहिल्यांदाच कार्यक्रम आयोजित केला होता.

त्यातच जयंती साजरी करण्यासाठी सालाबादप्रमाणे गोपीचंद पडळकर हे चौंडीत निघाले. मात्र नेमकं यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि सुरू झाला राजकीय राडा आणि वाद… राष्ट्रवादीने हा कार्यक्रम हायजॅक केल्याची टीका ही भाजपकडून होऊ लागली. तर पडळकर हे केवळ राजकारण करत आहेत, गोंधळ निर्माण करत आहेत, अशी टीका ही महाविकास आघाडीकडून होऊ लागली. तेव्हापासून हा वाद सुरूच आहे.

Team Global News Marathi: