आमदार राम कदमांनी केली राज्यपालांची पाठराखण ‘भाषणाचा आशय हा राष्ट्रप्रेमाशी निगडीत’,

 

मुंबईतून जर गुजराती, राजस्थानी लोकांना काढून टाकलं तर आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. शिवसेना पाठोपाठ काँग्रेसने सुद्धा राज्यपालांवर टीका केली आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने पाठराखण केली आहे.

राम कदम म्हणाले की, त्यांचे भाषण हे कापण्यात आले आहे. त्यांच्या भाषणाचा आशय हा राष्ट्रप्रेमाशी निगडीत आहे’असं म्हणत त्यांनी जोरदार पाठराखण केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या विधानामुळे अडचणीत सापडले आहे. त्यांच्या विधानावरून राजकीय सामना रंगला आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ‘मुळामध्ये राज्यपालांचं अर्धवट वाक्य कापून लावलं आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा अर्थ हा वेगळा निघणार आहे. त्याच्यामुळे त्या वाक्याच्या आधी काय बोलले, त्या वाक्याच्या नंतर काय बोलले, ते पूर्ण भाषण ऐकलं तर त्याचा आशय लक्षात येईल.

मुंबई ही सगळ्यांची आहे, मराठी माणसाची आहे. मुंबईमध्ये प्रत्येकाचे योगदान आहे. राज्यपालांच्या भाषणाचा आशय आपण हे समजून घेतला पाहिजे, मुंबईत सर्वांचं योगदान आहे, त्या दृष्टीने त्यांचे वक्तव्य आहे. त्या वक्तव्याला आपण राजकीय रंग देण्याची गरज नाही, असं राम कदम म्हणाले

Team Global News Marathi: