इशाऱ्यावर चालणारा “वाघ” नाही “पालतू कुत्रा” असतो ! – नितेश राणे

मुंबई | ओबीसी चिंतन बैठकीत काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो असे विधान करत शविसेनला टोला लगावला होता. आता वडेट्टीवार यांच्या विधानानंतर आमदार नितेश राणे यांनी नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला आहे.

इशाऱ्यावर चालणारा ‘वाघ’ नाही ‘पालतू कुत्रा’ असतो, अशा शब्दांत आमदार नितेश राणें यांनी या विधानावरून शिवसेनेची नाव न घेता खिल्ली उडवली आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी एका कार्यक्रमात वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो, असं विधान करून शिवसेनेला टोला लगावला होता.

या पार्श्वभूमीवर आ. नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून या वक्तव्या वरून निशाणा साधला आहे. मंत्री महोदय म्हणतात, आमच्या इशाऱ्यावर वाघ चालतो.. इशाऱ्यावर चालणारा वाघ एकतर सर्कस मध्ये असतो.. नाहीतर तो वाघच नसतो. त्याला पालतू कुत्रा म्हणतात!! बाकी समझदारोंको इशारा काफी है!!!, असं आ. नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: