धुळ्यात चोरांचा धुमाकूळ; पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी चोरांचा डल्ला


 

धुळ्यात चोरांचा धुमाकूळ; पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी चोरांचा डल्ला

धुळे : कोरोना महामारीचे संकट हळूहळू कमी होत असताना लॉकडाऊनही शिथिल झाल्याने चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. धुळे शहरातील पोलिस अधिकाऱ्यांच्या वसाहतीतील आझाद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या घरी चोरांना लाखो रुपयांचे सोने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.

धुळ्यातील आझाद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे हे सुट्टी असल्याने आपल्या गावी गेले होते, चोरट्यांनी याचाच फायदा घेत चोरट्यानी त्यांच्या बंद असलेल्या घरात घुसून जवळपास 10 ते 12 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली.

धुळे शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पाहणी केली, त्यानंतर रात्री उशिरा चोरीच्या घटनेबाबत गुन्हा दाखल करून पुढील तपास शहर पोलिस करीत आहे. विशेष म्हणजे या आधीही ह्याच घरात राहत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला असल्याच्या घटना घडल्या आहेत.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: