रुग्णसंख्येत थोडीशी घट ; राज्यात रविवारी आढळले ४१ हजार ३२७ रुग्ण

राज्यात सलग दुसर्‍या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, राज्यात रविवारी आढळले ४१ हजार ३२७ रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट

Corona in Maharashtra : मुंबई : आज राज्यात कोरोनाचे ४१ हजार ३२७ रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत आज राज्यात ११३५ रुग्ण कमी आढळले आहेत. तसेच आज ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

आज ४०,३८६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६८,००,९०० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३% एवढे झाले आहे. राज्यात आज २९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६% एवढा आहे.

सध्या राज्यात २१,९८,४१४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,१९,७४,३३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ७२,११,८१० (१०,०२  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज राज्यात ओमिक्रॉनचे ८ रुग्ण आढळले आहेत.

आज राज्यात ८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने  रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे पुणे व पिंपरी चिंचवड 8

आजपर्यंत राज्यात  एकूण १७३८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: