आरोपीच्या समर्थनात मोर्चा काढल्या प्रकरणी भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्यावर गुन्हा दाखल

आरोपीच्या समर्थनात मोर्चा काढल्या प्रकरणी भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्यावर गुन्हा दाखल

ग्लोबल न्यूज: आरोपी इरफान शेख यांच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार देवयानी फरांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आणि मोर्चेकरी होते. त्यापैकी २०० जणांविरोधात इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

वडाळा परिसरात डॉक्टर आणि स्थानिकांमध्ये वाद झाला होता. या वादात स्थानिक रहिवाशांपैकी एका जमावावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांवरोधात मोर्चा काढण्यात आला.

मात्र, यावेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह मोर्चात सहभागी झालेल्या २०० जणांवर गुन्हा दाखल केला. आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाखाली ज्या आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता; तो तडीपार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याच कारणामुले कठोर पाऊल उचलल्याच बोलले जातं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: