बार्शीतील, ‘सखी’ची अनोखी वटसावित्री पोर्णीमा

बार्शी – शहरातील सखी ग्रुप या समविचारी महिलांनी एकत्रीत येवुन वृक्षारोपन करीत अनोख्या पध्दतीने वटसावित्री पोर्णीमा साजरी केली.नगरपरिषदेच्या अहिल्यादेवी होळकर उद्यानात हा कार्यक्रम पार पडला.

अपर्णा शिराळ यांची एक कल्पना होती की, आपण पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी मनोकामना करतो, त्याच बरोबर आपल्या पर्यावरणाची हिरवळ जपली पाहिजे म्हणून त्यांच्या सोबतीने हा कायक्रम करायचा ठरला.

त्यासाठी प्रिया गुंडेवार, मधुरा मैरान – पाटील, प्रिया गुगळे, अपर्णा शिराळ, निता हागरे, रोशनी गुंडेवार, रुपाली नलवडे, सायली शहा, सविता येलमे, भाग्यश्री शेळके, वैष्णवी माळकर, आरती माळी अन्नपुर्णा चित्तापुरे ,पुजा काशीद, आनंदी जाधव दिपाली कांबळे,सोनिया दंग ,गौरी माळी, लता शिराळ, प्रिया गुंडेवार या महिलांनी पुढाकार घेत स्वखर्चाने रोपांची खरेदी, खड्डे घेणे सह सर्व खर्च उचलला. तसेच परिसरात राहणार्या रहिवास्यांनी या वृक्षा चे जतन करण्याची विनंती केली.
होळकर उद्यानात साजरी झालेल्या या अनोख्या वटपोर्णीमे चे सर्वत्र कौतुक होत आहे.

धिरज करळे: