उजनी धरणातून बार्शी शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा ठराव बार्शी पालिकेत मंजूर विविध विषयावर सभागृहात वादळी चर्चा

गणेश भोळे

बार्शी: बार्शी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उजनी धरणातून बार्शी शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या विषयासह विविध ३३ व आयत्या वेळच्या दोन विषयांना मंजूरी देण्यात आली़ स्वतंत्र पाणीपुरवठ्याच्या प्रस्तावावरील चर्चेत सत्ताधारी व विरोधी नगरसेवकात चांगलीच शाब्दीक खडाजंगी झाली.

नगराध्यक्ष आसिफ तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेतच्या प्रारंभीच विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले़ विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी कामकाजाला सुरुवात होण्यापुर्वीच एक दिवसाआड शहराला पाणीपुरवठ्याचे आश्वासन देऊनसुध्दा तशापध्दतीने पाणीपुरवठा होत नाही़ शहर पाणीपुरवठ््यांनी ग्रस्त असून शहराला दिलासा देणारे निवेदन अध्यक्षांनी करावे अशी मागणी केली.

यावर तांबोळी यांनी पावसाळा लांबला आहे, विजपुरवठा सतत खंडीत होत आहे, धरणातील पाणीपातळी खालावली आहे़ गळती काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे़ शहरात मागेल त्याला टँकरने पाणीपुरवठा सुरु असल्याचे सांगत खाजगी संस्थांची देखील याला मदत होत असल्याचे सांगीतले़
अक्कलकोटे यांनी जानेवारीपासून पाणीटंचाईचे नियोजन करावयास हवे होते़ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाणीटंचाई आराखडा का पाठवला नाही असा सवाल उपस्थित करत शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहवण्याची पालिकेची जबाबदारी आहे़ आँगस्टपर्यंत पाऊस पडला नाही तर उद्भवणाºया परिस्थितीला आपणा सर्वांनाचा सामोरे जावे लागेल अशी भिती व्यक्त केली.

विलास रेणके व पृथ्वीराज रजपूत यांनी शहरातील प्रत्येक भागाला समान प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

लातूर रोडवरील माईर्स एमआयटी मालकीचे गट नं़ २४ मध्ये स्मशानभूमी करण्याच्या विषयावर बोलताना अक्कलकोटे म्हणाले , या विषयाला मुख्याधिकारी यांचे अनुमोदन नाही,शाळा असलेल्या ठिकाणी स्मशानभूमी होेणे हे योग्य आहे काय ,हा नवा राजकीय दहशतवाद टाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली़ या विषयाला विरोधी पक्षांनी विरोध केला.

सत्ताधारी नगरसेवक विजय राऊत बार्शी शहरासाठी उजनी जलाशयावरुन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार करण्याचा प्रस्ताव मांडला़ त्यामध्ये शहराची लोकसंख्या ही वाढत असून ती १ लाख ६० हजारावर गेली आहे़ शैक्षणीक व आरोग्याच्या सोयीसुविधांमुळे शेजारच्या तालुक्यातील लोकांची वर्दळ जास्त आहे़ प्रधानमंत्री आवाज योजनासह खाजगी विकासकांची बांधकामे सुरु आहेत़ त्यामुळे पुढील काळात शहराला पाणीपुरवठा करणे अशक्य होणार आहे़ चांदणी व पाथरी योजना बंद आहेत़ त्यामुळे उजनी योजनेवर ताण आहे़ यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ शहरात पुढील तीस वर्षाचा विचार करुन वितरणव्यवस्था तयार केली आहे़ त्यामुळे उजनी जलाशयातून नवीन योजना करणे आवश्यक असल्याचे या ठरावात म्हटले.

विजय राऊत यांनी ही योजना पुर्वीच होणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही असा चिमटा काढला़ रमेश पाटील, मदन गव्हाणे, महेश जगताप, संतोष बारंगुळे यांनी राजेंद्र राऊत यांचे आभार मानत शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी ही स्वतंत्र योजना ते मुख्यमंत्र्याकडून लवकरच मंजूर करुन आणतील असा विश्वास व्यक्त करत,उजनीच्या जुन्या योजनेवर बोट ठेवले.

विरोधी पक्षनेते अक्कलकोटे यांनी नवीन योजना करण्याला आमचा पाठींबा आहे, मात्र ही योजना जवळची, कमी खर्चाची असावी अशी सूचना केली़ तसेच सिना नदी ही आठमाही असून रिधोरे येथील बंधाºयातून पाईपालाईन टाकून त्याद्वारे पाणी घ्यावे असेही सांगीतले़ नवीन योजना करा मात्र जुन्या योजनेवर उगीच टिका करणे योग्य नाही असे म्हणत ,तांत्रीक दृष्ट्या योग्य असा परिपूर्ण प्रस्ताव सभागृहासमोर आणावा आम्ही त्याला पाठींबा देऊ असे आश्वासन देत या विषयावर तटस्थ रहाणे पसंद केले.

आयत्या वेळच्या विषयामध्ये आयटीआय जवळील राऊत तळ्यामध्ये बार्शी उपसा सिंंचन योजनेच्या कॅनालमधून पाणी उचलून तळ्यात घेण्याचा विषय होता.या विषयावर बोलताना अक्कलकोटे यांनी आमदार निधीतून हे काम करण्याचे पत्र आ़ दिलीप सोपल दिलेले असताना हा विषया कशासाठी लावला असा मुद्दा उपस्थित केला.

तर गटनेते दिपक राऊत यांनी एवढा आमदार निधी शिल्लक आहे काय असा सवाल उपस्थित करीत पालिकेच्या वतीने हे काम करु असे सांगीतले़ शेवटी दोन्ही बाजूंनी चर्चा होऊन आमदा निधी व पालिका फंड यातील जे काम अगोदर होईल त्यातून ते करावे असे निश्चीत करुन सर्वानुमते विषय मंजूर करण्यात आला.

धिरज करळे: