मुंबईः महाराष्ट्रात २४ तासांत ६७ हजार ४६८ नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ५४ हजार ९८५ जण २४ तासांत कोरोनामुक्त झाले. तसेच २४ तासांत राज्यात कोरोनामुळे ५६८ मृत्यू झाले. 67 thousand 468 new covid19 cases in maharashtra
आतापर्यंत महाराष्ट्रात ४० लाख २७ हजार ८२७ कोरोनाबाधीत आढळले. यापैकी ३२ लाख ६८ हजार ४४९ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात कोरोनामुळे ६१ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला. कोरोना झालेल्यांपैकी १ हजार ७२० जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला, अशी माहिती राज्य शासनाने दिली. महाराष्ट्रात सध्या ६ लाख ९५ हजार ७४७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत २ कोटी ४६ लाख १४ हजार ४८० कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ४० लाख २७ हजार ८२७ कोरोना पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १६.३६ टक्के आहे. तसेच राज्याचा कोरोना मृत्यू दर १.५४ टक्के आहे. राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८१.१५ टक्के आहे. सध्या राज्यात ३९ लाख १५ हजार २९२ जण होम क्वारंटाइन आहेत तर २८ हजार ३८४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra reports 67,468 new #COVID19 cases, 568 fatalities and 54,985 discharges in the last 24 hours; case tally at 40,27,827 and active cases at 6,95,747 pic.twitter.com/TeEidCM5Q0
— ANI (@ANI) April 21, 2021
आज राज्यात ६७,४६८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४०,२७,८२७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ७६५४
२ ठाणे १०३९
३ ठाणे मनपा १३४३
४ नवी मुंबई मनपा ९६१
५ कल्याण डोंबवली मनपा १२३१
६ उल्हासनगर मनपा १५८
७ भिवंडी निजामपूर मनपा ६८
८ मीरा भाईंदर मनपा ६८४
९ पालघर ७७७
१० वसई विरार मनपा ७१२
११ रायगड ९६६
१२ पनवेल मनपा ८९८
१३ नाशिक २२३४
१४ नाशिक मनपा ४४६९
१५ मालेगाव मनपा ६५
१६ अहमदनगर २०९६
१७ अहमदनगर मनपा ८९६
१८ धुळे २३८
१९ धुळे मनपा ९९
२० जळगाव १००३
२१ जळगाव मनपा १०७
२२ नंदूरबार ३७१
२३ पुणे २९९८
२४ पुणे मनपा ५५३८
२५ पिंपरी चिंचवड मनपा २३१६
२६ सोलापूर ११३१
२७ सोलापूर मनपा ३३१
२८ सातारा १६४८
२९ कोल्हापूर ५७१
३० कोल्हापूर मनपा १९२
३१ सांगली ९४१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २२४
३३ सिंधुदुर्ग १७९
३४ रत्नागिरी ३३८
३५ औरंगाबाद ६०३
३६ औरंगाबाद मनपा ५८८
३७ जालना ८७७
३८ हिंगोली २४९
३९ परभणी ४९३
४० परभणी मनपा ३३५
४१ लातूर ११९८
४२ लातूर मनपा ४३९
४३ उस्मानाबाद ७२९
४४ बीड १०५६
४५ नांदेड ८९३
४६ नांदेड मनपा ४२५
४७ अकोला १९१
४८ अकोला मनपा १७२
४९ अमरावती ४७२
५० अमरावती मनपा २२८
५१ यवतमाळ १२३०
५२ बुलढाणा १००
५३ वाशिम ३६७
५४ नागपूर २३९५
५५ नागपूर मनपा ५१६०
५६ वर्धा ८८९
५७ भंडारा ११६०
५८ गोंदिया ६०६
५९ चंद्रपूर ११२५
६० चंद्रपूर मनपा ४५१
६१ गडचिरोली ५६१
एकूण ६७४६८
(टीप-आज नोंद झालेल्या एकूण ५६८ मृत्यूंपैकी ३०३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. हे १०५ मृत्यू, रायगड- २०, औरंगाबाद- १५, बुलढाणा- १०, नाशिक- ९, भंडारा- ८, पुणे- ७, ठाणे- ७, कोल्हापूर- ५, परभणी- ५, अहमदनगर- ३, चंद्रपूर- ३, नागपूर- ३, जळगाव- २, नांदेड- २, सातारा- २, बीड- १, नंदुरबार- १, सांगली- १आणि सिंधुदुर्ग- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रिये मध्ये यासर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २१ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)