“60 लाख पदे रिक्त, कुठे गेले बजेट?” पुन्हा वरून गांधी यांनी साधला मोदी सरकारवर निशाणा

 

भारतीय जनता पक्षाचे खासदार वरून गांधी मागच्या काही महिन्यापासून आपल्याच सरकारवर अर्थात मोदी सरकारवर टिकाव करताना दिसून येत आहे यापूर्वी सुद्धा बेरोजगार आणि वाढत्या महागाईवरून त्यांनी थेट मोदी सरकार पुढे काही प्रश्न उपस्थित केले होते आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारला बजेट मध्ये तरतूद करण्यात आलेल्या ६० लाख रिक्त पदाबाबत प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला आहे.

भाजप खासदार वरुण गांधी यांनी ट्विट करून केंद्रातील लष्कर, पोलीस, आरोग्य इत्यादींसह विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांची संख्या सांगितली आहे. ते म्हणाले, “बेरोजगारी 3 दशकांच्या सर्वोच्च पातळीवर असताना, ही आकडेवारी धक्कादायक आहे. नोकरभरतीअभावी कोट्यवधी तरुण निराश आहेत. दुसरीकडे सरकारी आकडेवारीच्या म्हणण्यानुसार, देशात 60 लाख ‘स्वीकृत पदे’ रिक्त आहेत. या पदांसाठी तरतूद करण्यात आलेले बजेट गेले कुठे?, हे जाणून घेणे प्रत्येक तरुणाचा हक्क आहे!”

दरम्यान, भाजप खासदार वरुण गांधी यांनी नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भले ते त्यांच्याच पक्षाचे सरकार असो. देशातील मंजूर सरकारी पदांवर भरती न करण्याच्या केंद्रातील भाजप सरकारच्या हेतूवर त्यांनी यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशात रिक्त असलेल्या सरकारी पदांबाबत वरुण गांधी यांनी थेट केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Team Global News Marathi: