सोलापूर शहरात शुक्रवारी आढळले 56 पॉझिटिव्ह रुग्ण

सोलापूर- महानगरपालिका क्षेत्रामध्ये शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार 976 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 920 अहवाल निगेटिव्ह आले असून 56 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 29 पुरुष तर 27 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 37 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.

तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.यामध्ये अक्कलकोट रोड परिसरातील कोंडा नगर भागातील 69 वर्षांची महिला तर विजापूर रोड परिसरातील नेहरूनगर भागातील 49 वर्षाचे पुरुष तर तिसरी व्यक्ती ही राजेश कोठे नगर परिसरातील 70 वर्षाचे पुरुष आहेत अशी माहिती देण्यात आली आहे आज पर्यंत एकूण 359 जणांचा बळी या आजाराने गेला आहे यामध्ये 236 पुरुष तर 123 महिलांचा समावेश होतो.

आता पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 4985 झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 359 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1590 आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 3036 लक्षणीय आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: