उसाच्या शेतातून तब्बल 50 लाख रुपये किंमतीचा 5 टन गांजा जप्त..!

उसाच्या शेतातून तब्बल 50 लाख रुपये किंमतीचा 5 tn गांजा जप्त..!

ऊसाच्या शेतात लपवून ठेवलेली गांजाची पॅकिंग असलेली शेकडो गाठोडी पोलिसांनी जप्त केली आहेत. यात काही चंदनाची लाकडे असलेली पण गाठोडी आहेत.

हि कारवाई पांढरीपुल- शेवंगाव रस्त्यावर मिरीच्या जवळ असलेल्या शंकरवाडी शिवारात करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणहून साधारण पाचशेच्या वर पॅकिंग करून ठेवलेला हा मुद्देमाल बापू आव्हाड आणि साहेबराव आव्हाड यांच्या मालकीच्या शेतातील ऊसाच्या मध्ये लपवून ठेवला होता.

पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी शिवारात ऊसाच्या शेतात गांजा ठेवण्यात आला होता. पोलिसांना शेतात गांजा लपवल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे आणि पाथर्डी पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने छापा टाकून कारवाई केली आहे.

या कारवाईमध्ये सोनई पोलिस स्टेशन आणि शनी शिंगणापूर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी देखील मदत केली. याशिवाय या गांजाची राखण करणाऱ्या 2 महिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: