४८ तासाच्या अल्टिमेटनंतर शरद पवार सीमाभागात जाणार होते, त्याचं काय झालं? भाजप नेत्याने डिवचलं

48 तासाचं अल्टिमेटम देतोय. कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर मार्ग काढला नाही तर मी स्वतः बेळगावात जाईन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला दोन दिवसांपूर्वी शऱद पवार यांनी हा इशारा दिला होता, त्याचं काय झालं, असा सवाल करत भाजप नेत्याने डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्न चिघळला असून केंद्र सरकार किंवा महाराष्ट्रातील भाजप यावर काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांना असा प्रश्न विचारलाय. निलेश राणे यांनी आज एका ट्विटद्वारे शरद पवारांना हा प्रश्न विचारलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागंलय.

बेळगाव येथील सीमावासिय प्रचंड दहशतीत आहेत. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना सहकार्याची अपेक्षा आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री वारंवार चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने यात लवकरात लवकर हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र सरकारने काही केलं नाही तर परिस्थिती आणखी चिघळेल. यासाठी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा इशारा शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिला होता.

 

 

Team Global News Marathi: