सोलापूर शहरात 43 कोरोना पॉझिटिव्ह; चार मृत्यू,189 जण झाले बरे

सोलापूर : सोलापूर शहरात आज शुक्रवारी आलेल्या अहवालात कोरोनाचे 43 रुग्ण आढळून आले आहेत. चार मृत्यू तर कोरोनावर तब्बल 189 जणांनी मात केली आहे. त्यामध्ये 115 पुरूष आणि 74 महिला रूग्णांचा समावेश आहे.

शहरातील आजवर पाच हजार 334 रुग्णांपैकी तीन हजार 730 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे होटगी रोडवरील मोहिते नगरातील 43 वर्षीय पुरुषाचा, देगाव परिसरातील साठे-पाटील वस्तीवरील 63 वर्षीय पुरुषाचा, विडी घरकूल परिसरातील 59 वर्षीय पुरुषाचा आणि अक्‍कलकोट रोड परिसरातील 70 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला.

मोदी खाना, केगा, न्यू बुधवार पेठ, उमानगरी, सुरज नगर, सरस्वती नगर, जेले नगर (शेळगी), संतोष नगर, सरस्वती नगर, कल्याण नगर (जुळे सोलापूर), वसंत विहार, मनपा शाळेजवळ (रामवाडी), एसआरपी कॅम्प, रविराज अपार्टमेंट (दावत चौक), दक्षिण सदर बझार, प्रियंका नगर, रुबी नगर, स्वामी विवेकानंद नगर, सुनिल नगर, काजल नगर,

शिवाजी नगर, काकडे गल्ली (बाळे), हौसे वस्ती, सुंदरम नगर (विजयपूर रोड), कित्तूर चनम्मा नगर, मजरेवाडी, पंचशिल नगर (कुमठा नाका), अरविंदधाम पोलिस लाईन, दाजी पेठ (राम मंदिराजवळ), राहूल नगर (मजरेवाडी) या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: