राज्यात 4.51 लाख सक्रिय रुग्ण; आज 47,288 नव्या रुग्णांची नोंद

राज्यात 4.51 लाख सक्रिय रुग्ण; आज 47,288 नव्या रुग्णांची नोंद

ग्लोबल न्यूज – आज राज्यात 47 हजार 288 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढली असून सध्या राज्यात 4 लाख 51 हजार 375 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 30 लाख 57 हजार 885 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 25 लाख 49 हजार 075 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आज 26 हजार 252 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.08 टक्के एवढं झाले आहे.

राज्यात आज 222 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 56 हजार 033 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.86 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 24 लाख 16 हजार 981 जण होम क्वारंटाईन आहेत. तर, 20 हजार 115 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 07 लाख 15 हजार 793 नमूने तपासण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसीकरणाचे वय 25 वर्षांपर्यंत कमी करावे अशी मागणी केली आहे. यामुळे लसीकरणाची संख्या वाढेल तसेच, वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला ब्रेक लागेल असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: