सोलापूर शहरात 363 तर ग्रामीण भागात 714 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले; दोन्हीकडे मिळून 18 मृत्यू

सोलापूर शहरात 363 तर ग्रामीण भागात 714 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले; दोन्हीकडे मिळून 18 मृत्यू

सोलापूर : विकेंड लॉक डाऊन असताना ही सोलापूर शहर व ग्रामीण जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ ही सुरूच आहे. शनिवारी शहरात 363 रूग्ण आढळले असून त्यात होटगी रोड, जुळे सोलापूर, विजयपूर रोडवरील सर्वाधिक रुग्ण आहेत. ग्रामीण भागात आज 714 रुग्ण आढळले असून त्यात पंढरपूर, माळशिरस, करमाळा, बार्शी, माढा या तालुक्‍यातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. दुसरीकडे चिंतेची बाब म्हणजे शहरातील 11 तर ग्रामीणमधील सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज दि.10 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 714 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.एकाच दिवशी 7 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.

आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 451 आहे. यामध्ये 304 पुरुष तर 147 महिलांचा समावेश होतो .आज एकूण 7725 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 7011 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

कोरोनाची साखळी खंडीत करून रुग्ण व मृत्यूदर कमी करण्याच्या हेतूने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही, रुग्ण वा मृत्यूदर थांबत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सोलापुरात कोरोनाचे आगमन होऊन 12 एप्रिलला वर्ष पूर्ण होणार आहे. तत्पूर्वी, जिल्ह्यातील 70 हजारांहून अधिक व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली असून मृतांची संख्या एकविसशेच्या उंबरठ्यावर आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले, परंतु ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले, त्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात ओढल्याचे चित्र मागील वर्षभरात पहायला मिळाले. गरीब, झोपडपट्ट्यांच्या परिसरातील कोरोनाने आता हौसिंग सोसायट्या, अपार्टमेंटमध्ये शिरकाव केला आहे.

हातावरील पोट असलेल्या बहुतेक नागरिकांनी नियमांचे पालन करीत, विनाकारण घराबाहेर पडणेच बंद केले. मात्र, विविध कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले नाही. त्यामुळे वर्षानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसत नाही. आता तरी नागरिकांनी संभाव्य धोका ओळखून नियमांचे तंतोतंत पालन करावे, हीच अपेक्षा.

तालुकानिहाय वाढलेले आजचे रूग्ण
पंढरपूर (142), बार्शी (129), माळशिरस (102), माढा (91), करमाळा (72), मंगळवेढा (56), मोहोळ (35), उत्तर सोलापूर (27), दक्षिण सोलापूर (21), अक्‍कलकोट (20), सांगोला (19).

 

 

आज शनिवारी 10 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 714 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 452 पुरुष तर 262 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 451 आहे. यामध्ये 304 पुरुष तर 147 महिलांचा समावेश होतो .आज 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 7725 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 7011 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: