31 डिसेंबर 2019 पर्यंत होणार मंत्रिमंडळ विस्तार – अजित पवार

मुंबई | नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजेच 31 डिसेंबर 2019 पूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होईल अस राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरेंनी मनात आणल्यास हा मंत्रिमंडळ विस्तार झालेला असेल असे ते म्हणाले. या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे कोण उपमुख्यमंत्री, कोण मंत्री असतील हे पवार साहेब ठरवतील असेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

पुढे अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांविषयी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. सिंचन घोटाळ्याबाबत जी क्लीन चिट मिळाली त्याबाबत नो कॉमेंट एवढीच प्रतिक्रिया अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आमचे उपमुख्यमंत्री असतील असं वक्तव्य केलं होते. यावर बोलताना ते म्हणाले की, ‘कुणाला कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय शरद पवार घेणार आहेत. शरद पवार जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल. संजय राऊत काय म्हणाले ते मी वाचलेलं नाही.’ असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: