26 दिवसांच्या प्रवासानंतर गजानन महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात

सोलापूर – आषाढी वारीसाठी शेगावहून येथून 8 जून रोजी निघालेली संत गजानन महाराजांची पालखी 26 दिवसांचा पायी प्रवास करून गुरूवारी सोलापूर जिल्ह्यात उळे येथे दाखल झाली. हा सोहळा आता 5 व 6 जुलै हे दोन दिवस सोलापूर मुक्कामी असणार आहे.

सर्वात दूरवरून येणार्‍या पालखी सोहळ्यात या शेगावच्या पालखीचा समावेश आहे. पंढरपूरला पोहोचे पर्यंत किमान 33 दिवस त्यांना प्रवास करावा लागतो. अत्यंत शिस्तबध्द पालखी सोहळा म्हणून याकडे पाहिले जाते. श्री क्षेत्र तुळजापूरचा मुक्काम आटोपून पालखी आज सकाळी तेथून निघाली व मराठवाड्यातून या सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात सायंकाळी प्रवेश केला

. उळे येथे आज पालखी सोहळा विसावला आहे. या पालखीचे सोलापूर जिल्ह्याच्या वतीने अधिकारी व लोकप्रतिनिधींनी स्वागत केले. या सोहळ्याच्या दर्शनासाठी मोठी गर्दी येथे उडाली होती.

दरम्यान गजानन महाराजांची पालखी पुढील दोन दिवस सोलापूर मुक्कामी असून येथे शहर व परिसरातील भक्तांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. यानंतर ही पालखी तिर्‍हे, माचणूर, मंगळवेढा मुक्काम करून दशमीला 10 जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होईल.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: